मुंबई | हिंदी दिवस साजरा करण्यात आला खरा पण त्यातून नवीन वादाला फोडणी मिळाली आहे.
अमित शहा यांच्या एक भाष्या एक देश ,ह्या विधानाला जोरदार विरोध सुरू झाला असून दक्षिणेकडील राज्यातून विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. स्टॅलिन यांनी हे विधान मागे घेण्याची मागणी केली आहे. तर कर्नाटक आंधरप्रदेश इथून ही विरोधाचे सूर उमटू लागले आहेत.
पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता दीदी यांनी ही यास विरोधदर्शवला आहे.,तर ओवेसी यांनी याला हिंदुत्वाची जोड देऊन सरकार वर टीका केली आहे.
खर तर भाष्या ही प्रत्येक राज्याची अस्मिता असते वैभव असते आणि सांस्कृतिक ठेवा ही असतो. त्या भाषे बद्दल जिव्हाळा आणि आत्मीयता ही प्रत्येक त्या त्या भाषिक व्यक्तीला असतेच .आणि त्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न होत असेल तर चीड निर्माण होणे स्वाभाविक असून इतर भाषेला विरोध हा होणार तरी ही एक भाष्या एक देश बोलणं कितपत योग्य आहे.मुळात स्वतंत्र मिळाल्या नंतर पासून दक्षिणेतील राज्य ही हिंदीला राष्ट्र भाषेचा दर्जा देण्यास तयार। नाहीत. अजून ही ते हिंदी बोलत नाहीत. मग त्यांना हा जिव्हारी लागणार घाव कश्या साठी.देशात हिंदी बोलणाऱ्यांची संख्या अजूनही अर्ध्या पेक्ष्या ही कमी असताना हिंदी चा हा अट्टहास का?
भाष्या मरता देश ही मरतो सांस्कृतीचा दिवा विझे…
ही कवितेची ओळ बरच सांगून जाते ज्या ज्या भागात बोलली जाते ती भाष्या त्यांची आपली आहे.तिच्यावर त्यांची संस्कृती टिकून आहे तिच्यावर घाला येत असेल तर विरोध होन स्वाभाविक आहे.
Add Comment