सोलापूर | येथे सेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. आणि ह्या मेळाव्यात नवे आणि जुने दोन्ही असल्या मुळे वातावरण जरा वेगळ होत. त्यात करमाळा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील आणि नुकत्याच सेनेत दाखल झालेल्या रश्मी बागल यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला.
रश्मी बागल यांनी आता आपण एक झालो. असून जुने वाद विसरून खांद्याला खांदा देऊन काम करावे लागणार अस बोललं होत. त्याचा धागा पकडत विद्यमान करमाळा मतदारसंघाचे आमदार नारायण पाटील यांनी भन्नाट कल्पना मांडली ते आपल्या भाषणात म्हणाले रश्मी ताई यांना तिकीट दिल तर मी गप्प बसणार नाही. आणि मला तिकीट दिल तर ताई गप्प बसणार नाही. त्यामुळे व्यासपीठावर माढा तालुक्याचे नेते बसले होते.
नारायण आबांनी त्यांना सांगितलं आम्ही दोघे ही नको तुम्ही करमाळा मतदारसंघात उभे रहा. आम्ही दोघे मिळून पक्ष हित डोळ्या समोर ठेऊन आपलं काम करू अस म्हणताच जोरदार हास्याची लाट उसळली .
Add Comment