Articles

_मुंबईचा पाऊस अन् मी _______ साहित्यिक…

  • 6
  • पाऊस अंगावर झेलतच मी रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडलो.मुंबईच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानक खूप मोठं.भव्य दिव्य….याच ठिकाणी अजमल कसाबने गोळीबार केला होता.मी पाठीवर बॅगच ओझं घेऊन सारं न्याहाळत होतो.तस मुंबईच अन् माझं नातं खूप दिवसांपासूनच.अगदी अन्नाभाऊं साठेंच्या माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतेया काहिली,,, तेव्हापासूनच.बाहेर पाऊस सुरूच होता.मी तसाच बाहेर पडलो.पावसात पुर्ण भिजून गेलो.मला पाऊस आवडतो….मलाच काय प्रत्येकालाच तो हवाहवासा वाटतो….पावसात भिजून आनंद घ्यावा वाटतो….पावसात बाहेर फिरायला जाण्याची मजा काही वेगळीच.पण जरा सांभाळूनच.नाहितर कालपरवा लोणावळ्यातील घटणे सारखं नको.त्यामुळे मोह आवरलेलाच बरा….ओल्या कपड्यानिशीच मी बस मध्ये चढलो.इंडिया गेटच तीकिट काढलं….बाहेर रस्त्याच्या कडेला मोठमोठ्या इमारती दिमाखात उभ्या होत्या….मी नुसता पाहतच होतो.तस सुरवातीपासूनच मला मुंबईच्या उंच उंच इमारतीचं विलक्षण वेड होतं….मी डोळे भरून पाहत होतो.लोकांची गर्दी.गर्दीतील मानसं.त्यांच ते बोलन.मी बारकाईने टिपत होतो….थोड्याच वेळात इंडिया गेट आलं.खाली उतरलो….पाऊस सुरूच होता.तो काही माझी साथ सोडायला आज तयारच नव्हता….मी तसाच पावसात भिजत एक-एक पाऊल टाकत चालू लागलो….समोर पोलीसांचा तगडा बंदोबस्त होता.तो पार करत समोर गेलो….पाहतो तर काय.भल मोठं प्रवेशद्वार…पाहताक्षणी डोळे दिपून जावेत,,,मी जसाजसा समोर जात होतो,तसतस त्यांचं अलौकिक दर्शन घडतं होतं,,,फारच सुंदर कलाकृती,,,पाहताक्षणी प्रत्येकाला भुरळ पडावी….माझ्याप्रमानेच तो दरवाजा चींब पावसात भिजत कुणाचीतरी वाट पाहत युगानुयुगे स्थीतप्रज्ञासारखा समुद्र किनारी उभा होता….कधी समुद्राच्या भल्या मोठ्या लाटा अंगावर झेलत तर कधी थंडिच्या गारव्यात तर कधी उन्हाच्या तप्त झळा सोसत,तो बिचारा तसाच एका ठिकाणी निपचीत उभा होता….लोक मात्र त्याला पाहण्यासाठी कालही आणि आजही आतूर….आजही भर पावसात लोक त्यांची भव्यदिव्यता बघत होते….अरबी समुद्राच्या कडेला हा भला मोठा दरवाजा..‌‌.इंडिया गेट म्हणून प्रसिद्ध.मुबईच प्रवेशद्वार. इंडिया गेटचा हा दरवाजा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदारही राहिला आहे….त्याच्या बाजुलाच अगदी हाकेच्या अंतरावर समुद्राच्या काठावर वसलेलं ताज हॉटेल दिमाखात उभं होतं‌….येथेच देशविदेशातील लोकांचा मुक्काम असतो….आपल्या सारख्या गरिब, सर्वसामान्यासाठी आत प्रवेश करणं म्हणजे दिवास्वप्नच….मी दुरूनच ते न्याहाळत होतो.ताज हाॅटेल ते.जीथं गरिबीला तसूभरही जागा नाही. गरिबांनी दुरूनच ते पहावं.त्याला डोळ्यात साठवावं…..गर्भ श्रीमंत लोकांच मात्र ते हंक्काच ठिकाण….आपण दूरूनच पाहिलं की आपलं पोट भरावं‌….मी थोडा समोर गेलो….पावसाने चांगलाच जोर पकडला होता….समोर आभाळ समुद्राला टेकलेल दिसत होतं…लाटांचा प्रचंड आवाज येत होता….बेभान होऊन त्या काठावर आदळत होत्या…लोकांना समोर जाऊ दिल्या जात नव्हतं…मी थोड्या अंतरावरच उभा राहून ते सारं दृश्य पाहत होतो….समुद्राच ते अक्राळ विक्राळ रूप फारच भयावह जाणवत होतं… ऐरव्ही तो शांत,निपचीत पण पावसाळ्यात मात्र मोठमोठ्या लाटांनी उधाण आलेला…इंथ लोकांची गर्दी… गर्दीतली बरीच लोक दर्दी…नेहमी गजबजलेल ठिकाण… प्रत्येकाच्या पसंतीच…लोक मोबाईने फोटो काढत होते.पावसात भिजत होते… पावसाच्या सरीवर सरी बरसतच होत्या….मुंबईचा पाऊस तो… हरेकाला हवहवासा वाटनारा….तरुणाईसाठी तर आनंदाची पर्वणीच….इंडिया गेटवर लहान मूलं,त्यांची आई वडील, आणि तरूण तरूणीचा मोठ्या प्रमाणावर भरणा….वरून पाऊस,समोर भला मोठा समुद्र, त्यांच्या उंच उंच लाटा, समुद्र किनारी दिमाखात उभ्या असलेल्या मोठमोठ्या इमारती….डोळ्याचे पारणं फेडणार ते मनमोहक दृश्य प्रत्येकाल हवंहवंसं वाटणारं….याच पावसात तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली तरूणाई चिंब भिजून हातात हात घेत पावसाचा आनंद घेत होती….त्यांना कसलंच भय नव्हतं….जीवनाच्या वळणावर भविष्याची स्वप्न रंगवत एकमेकांच्या डोळ्यांत पाहत ती सुखी संसाराची स्वप्नं पाहत होती….मी थोडा भूतकाळात हरवलो….मन मनाशी बोलू लागलं….आपणही तरूणपन अनुभवलं.प्रेमाचे अंकुर आपल्याही काळजावर उगवले…वयात आल्यावर आपल्यातही बदल झाला…. प्रेमाच्या दुनियेत मलाही आकंठ बुडावं वाटत होतं…यौवनात गुरफटलेलं माझंही मन सैरभैर धावत होत….पण तेव्हाच मला काॅलेजच शिक्षण घेण्यासाठी जी.एस.कॅलेजच्या पाठीमागे भाड्याने केलेली माझी खोली आठवली.पिठाच्या डब्यात एका साजेचं भागेल एवढंच पिठ…स्टोमधलं राॅकेल दोन दिवसा अगोदरच संपलेल…कधीकधी वर्गात तास चालू असतांनाच विचार यायचा आपली संध्याकळची सांज कशी भागेल….?मग मला माझे बाबा दिसायचे,हातात साडेतीन फुटाची काठी घेवून गावातील पाटलाच्या शेतात भर पावसातही शेताची रखवाली करण्यासठी जातांना…माय दिसायची हातात खुरप घेवून माझ्या बहिनीना सोबत घेवून निदायला जातांना…‌.माझ्यासाठी सारं कुटुंब जीवाच रान करत होतं.पोरग चांगलं शिकलं पाहिजे.हुशार झालं पाहिजे.चागल्या नोकरीवर लागलं पाहिजे त्यासाठी मायबपाची धडपड चालू असायची….लेकासाठी माय झिजत होती.काडीमुडीचा देह तीचा पण भिजलेल्या डोळ्यात एकप्रकारची आस होती…. चमक होती….वेदनेन तीचा देह व्युव्हळायचा…पण तरी माझ्या सुखी साठी ती घाम गाळत होती…मी काॅलेजमध्ये खामगावला जातांना माझ्या पिशविमध्ये गहू असायचे,एका पिशवित राॅकेलची कॅन.एक बॅग पाठिवर घेतलेली…माय तोंडावरून हात फिरवत;बाप पाठिवर हात ठेवत मला निरोप देत रस्त्यावर बराच अंतर माझ्यासोबत चालायचे…मी आपलं जड झालेलं एक -एक पाऊल पुढं टाकत कधी पाठमोरं होत परत चालत जायचो…हे सारं दृश्य माझ्या नजरेसमोर यायचं…माझ्या आयुष्याचा हा सारिपाट मला सारखा अस्वस्थ करत होता…. भावनांचे हुंदके बाजुला सारत मी स्वतःला सावरले….समोर पाणीच पाणी दिसत होतं…तरूण तरूणीच्या अंगावर समुद्राच्या लाटांच्या पाण्याचा वर्षाव होत होता.प्रेमात आकंठ बुडालेली ही तरूणाई प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होती.मी आपला एका बाजूला समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांकडे पाहत,मनात प्रीतीच्या भावनांच्या साठवत विरहाच्या लाटा अंगावर झेलत उभा होतो….पावसाच पाणी माझ्या मनाला साद घालत मला चींब भिजवत होतं….माझी नजर दूरवर गेली,जीथं सुमुद्र भुईला टेकलेला दिसत होता….मग आपसूकच माझ्या ओठातून शब्द बाहेर पडले….
    जीथे सागरा धरणी मिळते,
    तीथे तुझी मी वाट पाहते,वाट पाहते,,,,,

सागर झनके
9822575244