भोकरदन जालना :
तालुका प्रतिनिधी :शेख समद.
माजी खासदार दानवे यांच्या होमपीच वर खासदार डॉ.कल्याण काळेंचा जलवा.
बाप तो बाप रहेगा गाण्यावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धरला ठेका.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकिमध्ये जालना लोकसभा मतदारसंघातुन महाविकासआघाडीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या विक्रमी विजयानंतर सत्कार सोहळे सुरु झाले आहेत. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा । लाख 17 हजार मतांनी डॉ. कल्याण काळे यांनी दारून पराभव करत दिमाखात संसदेत पाऊल ठेवले. या विक्रमी यशानंतर खासदार काळे यांचे सत्कार सोहळे सर्वत्र सुरु झाले आहेत. भोकरदन महाविकास आघाडीच्या वतीने दि. 15 जुन रोजी श्रीकृष्ण मंगल कार्यालय भोकरदन येथे मतदारांचे आभार मानण्याकरिता व महाविकास आघाडीचे खासदार डॉ. कल्याण काळे यांना नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर शहरातील मा.आ. चंद्रकांत दानवे यांचे संपर्क कार्यालय ते श्रीकृष्ण मंगल कार्यालयापर्यंत त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात, डिजेच्या तालावर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बाप तो बाप रहेगा.. मै हु डॉन… या गाण्यांवर बेधुंद नाचताना दिसत होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर यावेळी फटाक्यांची अतिषबाजी सुद्धा करण्यात आली. या विजयी मिरवणुकिमध्ये खा. डॉ. कल्याण काळे, मा.आ. चंद्रकांत दानवे, राजाभाऊ देशमुख, माजी आमदार संतोष सांबरे, बबलु चौधरी, सुधाकर दानवे आदी मान्यवर खुल्या जीपमध्ये विराजमान होते. नागरी सत्कार सोहळ्यावेळी मा.आ. चंद्रकांत दानवे यांनी खासदार डॉ. कल्याण काळे यांचा सत्कार करत बोलतांना म्हणाले की, भोकरदन विधानसभा हा माजी खासदार दानवे यांचा स्थानिक मतदारसंघ असुन सुद्धा या मतदारसंघातुन खा.डॉ. काळे यांना 962 मतांचे मताधिक्य मिळालेले आहे. आपल्या हक्काचा प्रतिनिधी दिल्ली गेल्याचा अभिमान वाटतो. यामुळे सरकार दरबारी मंडळांचे विविध प्रश्नं सुटण्यासही मोठी मदत होणार आहे.
तसेच खासदार डॉ. कल्याण काळे यांनी महाविकासआघाडीच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे तसेच मतदारांचे आभार व्यक्त करत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच ते बोलतांना म्हणाले की, भोकरदन विधानसभेतील कार्यकर्त्यांनी कामाच्या संदर्भात कधीही संपर्क साधला तरी प्राधान्याने भोकरदन तालुक्यातील आणि जाफराबाद तालुक्यातील काम पूर्ण करण्याचे जबाबदारी माझी राहील कारण माजी खासदार दानवे यांच्या स्वतःच्या मतदारसंघात लीड देण्याचं काम या मतदारसंघातील बहाद्दर जनतेने केले आहे असे सांगितले तर यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल अशी ग्वाही दिली यावेळी राजाभाऊ देशमुख, माजी आमदार संतोष सांबरे, बबलू चौधरी, सुधाकर दानवे,शफिक शेठ पठाण, रमेश शेठ सपकाळ, त्र्यंबक पाबले, नवनाथ दौड,राहुल देशमुख आदींनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अंकुश जाधव यांनी केले तर आभार अशोक पवार यांनी मानले, यावेळी कार्यक्रमाला…….
आदींसह
या सत्कार सोहळ्याला तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Add Comment