Editor Choice Uncategorized कवी-कट्टा

रावेर शहरात महावितरणचे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवाशी खेळ 

 

रावेर (प्रतिनिधी)

रावेर शहरात काही दिवसापासून पाऊस सुरू असल्यामुळेही अनेक ठिकाणी उघडे डी पी पडले आहेत. दरवाजे नसल्याने विद्युत तारांचे जाळे उघड्यावर आहे या उघड्या तारांना एखादा व्यक्तीच्या अनुधानाने स्पर्श झाल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही .रोहित्रांना दरवाजा लावणे देखभाल दुरुस्तीचे जबाबदारी वीज कंपनीवर आहे मात्र याविषयी कुठल्याही गंभीर चे दिसत नसून रोहित्रांची स्थिती शहरात अनेक ठिकाणी दिसत आहे.

रावेर शहरातील मुख्य रस्त्यावरून शाळेत ये-जा करणाऱ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत आपल्या शिक्षण पुर्ण करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना जीवाला धोकाही निर्माण झाला आहे.

याबाबत वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असून एखादी अनुचित घटना घडल्यास यास जबाबदार कोण ?

रावेर शहरातील बहुतांशाने रोहित्र रस्त्याच्या बाजूलाच आहेत अनेक रोहित्रांना संरक्षण जाळी लावण्यात यावी परंतु याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे एकंदरीत चित्र वरून दिसून येत आहे .

रस्त्यावरील उघड्या डीपी तसेच सर्रासपणे तरीही याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे कोणाचा तरी जीव गेल्या वरच संबंधित विभागाला जाग येईल का असा प्रश्न रहिवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

बऱ्याच दिवसापासून उघडे डी पी दिसत आहे एखादा लहान बालकाचा हात सहजरीचा या डीपी पर्यंत पोहोचू शकतो महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️

⚛️फक्त एकदा परत ये……

भुकेआधी घास दिलास
पडण्याआधी हात दिलास
अश्रू अनावर आहेत
कुशीत घ्यायला आई
फक्त एकदा परत ये…..

बोबडे बोल ते माझे
विनाकारण ते रडणं
तुला जसे समजले
मलाही ते समजायचंय आई
फक्त एकदा परत ये….

उबदार पदराने तुझ्या
थंडी,वारा लागलाच नाही
मायेच्या घासाने तुझ्या
भूकही जाणवली नाही
तुलाही भरवायचंय आई
फक्त एकदा परत ये….

काबाडकष्ट तुझे माझ्यासाठी
उणीव माझ्याकडूनच राहिली असेल
तुझ्या वात्सल्याचे पांग फिटणार नाहीत
पण प्रयत्न तर करू दे आई
फक्त एकदा परत ये……

– महेंद्र कांबळे (माही)

⚛️2

अण्णाभाऊंच्या जीवनाची, सांगतो मी कहाणी,
कष्टकऱ्यांच्या दु:खात, होते ते समाधानाचे धनी
लेखणीच्या ताकदीने, घडवली नवी क्रांती,
शोषितांच्या वेदनांतून, तोडली
गुलामगिरीची नाती

जातीयतेच्या अंधारात, उजळला माणुसकीचा दीप,
लढवय्याच्या उमेदीने, त्यांनी पसरवले सत्याचे गीत
शब्दांमध्ये होती त्यांची, भेदभाव
मिरवण्याची हुंकार,
अण्णाभाऊंच्या कथेने, दिले स्वातंत्र्याची दरकार

सतत चालत राहिले, न थांबता, न थकता,
शोषितांच्या मनांत, प्रकटला आशेचे तारा
अण्णाभाऊंच्या संघर्षाने दिला
दिन दुबळ्यांना सहारा
क्रांतीच्या वाऱ्यात पाझरला
नव्या स्वप्नांचा झरा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या महान कार्याला नमन

– महेंद्र कांबळे (माही)

Featured

Advertisement