Maharashtra

मुख्यमंत्री “लाडकी बहीण” योजने संदर्भात “आत्ता पर्यंतची सर्वात मोठी अपडेट “

*पाटोदा तहसील कार्यालयांच्या भिंती रंगल्या गुटख्याच्या पिचकाऱ्याने*
पाटोदा (गणेश शेवाळे) तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी जात असतात कार्यालयकडे जाणाऱ्या जिन्यातील भिंतींवर व परिसरात कोणीही धूम्रपान अथवा या ठिकाणी थुकू नये असा बोर्ड सुद्धा असतानाही या परिसरातील जिन्याच्या भिंतीवर अनेक ठिकाणी पिचकऱ्या मारलेल्या आढळून येत आहे.
तसेच जिन्यातील भिंतीवर कॅमेरा सुद्धा असल्याने या कॅमेरामध्ये थूकणारे व धूम्रपान करण्याऱ्या व्यक्तींवर प्रशासनाने कधी दंडात्मक कारवाई केली आहे का? या ठिकाणी लावलेले फलक व सी.सी.टि.व्ही.कॅमेरा हे शोभेचे वस्तू बनलेले आहे का? असाही सवाल उपस्थित होत आसुन.कार्यालयाच्या इमारतीमध्ये थुंकणाऱ्या व धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर तर काही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा धूम्रपान करताना दिसतात.या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

Featured

Advertisement