Front Maharashtra Politics

सुप्रिया ताई मला फक्त १५ दिवस द्या, मी बघतो त्यांच्याकडे ………

 

मुंबई | मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सहन कराव्या लागाणाऱ्या त्रासाचा प्रत्यय काल खा.सुप्रिया सुळे यांनाही आला. रेल्वेने प्रवास करत असताना दादर रेल्वे स्थानकावर एका दलालाने सुप्रिया सुळे यांच्याबरोबर गैरवर्तन केले. आपल्याच टॅक्सीत बसावं असं या दलालाचं म्हणणं होतं. एवढेच नाही तर त्याने त्यांचा रस्ता अडवण्याचाही प्रयत्न केला. याबाबतची माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विटर वरुन रेल्वे मंत्रालयाला दिली.

यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितिन नांदगावकर यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये बोलताना त्यांनी सांगितले ताई मला फक्त पंधरा दिवस द्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर एकही दलाल किंवा टॅक्सीवाला दिसणार नाही. यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाला पंधरा दिवसाचा अवधी दिला असुन कारवाई न झाल्यास आपण आपल्या स्टाईलने प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले.

मुंबईमध्ये टॅक्सीचालक व दलालांची चालु असलेली अरेरावी या घटनेतुन समोर येते. पोलीस व प्रशासनाचा वरदहस्तच अशा घटनांचा कारणीभूत आहे. एका महिला खासदाराला अशा त्रासाला सामोरे जावे लागते तर सामान्य नागरिकांच्या बाबतीत काय घडत असेल? असा प्रश्न समोर येतो.

Featured

Advertisement