प्रतिनिधी :छत्रपती संभाजीनगर
दि.२५ झुंजार प्रजातंत्र वृत्तसेवा :
- लोकसभेची रणधुमाळी अवघ्या देशांत मोठ्या उत्साहात सुरु असतांना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघातुन आता एक नवीन चेहरा आपले नशीब अजमावून पाहत आहे. पत्रकार तथा सामाजिक चळवळीत अत्यंत अग्रेसर असणारे संदीप मानकर यांनी काल ता.२५ रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांचेकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भडकल गेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यास अभिवादन करुन आपला उमेदवारी अर्ज भरला.
सामान्य जनतेच्या विकासाचे राजकारण सोडुन राजकीय मंडळी आपल्या स्वार्थासाठी इकडून तिकडे उद्या मारत असल्याने त्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी हे भीषण प्रश्न समोर असतांना यांवर राजकीय पुढाऱ्यांनी अगदी कानाडोळा केला आहे. म्हणून या सर्व प्रश्नांना हाती घेऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करीत असून मतदारराजांनी सुद्धा राजकीय पुढाऱ्यांच्या आमिषाला बळी न पडता विकासकामे करणाऱ्याच माणसांना निवडून देऊन लोकशाही बळकट करावी असे आवाहन उमेदवार संदीप मानकर यांनी जनतेला केले आहे..!
×
Add Comment