- सिल्लोड :वृत्तसेवा
“चला गड्यानों चला मतदानाचा हक्क बजवू चला” नुकत्याच येवू घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या औचित्याने मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी दि . 20 रोजी पानवडोद ता सिल्लोड येथे SVEEP नोडल अधिकारी राजीव फुसे, गटशिक्षणाधिकारी अनिल पवार, तहसिलदार रूपेश खंडारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण ,यांच्या मार्गदर्शना खाली 60% च्या खाली मतदान झालेल्या गावांत जाऊन श्रीमती सरला कामे व sveep टिम सदस्या श्रीमती वंदना कवाल श्रीमती शालीनी काळे ह्या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मतदान जागृती “*जागो मतदार जागो*” मतदान जनजागृती करीत आहे संविधानाने दिलेला हक्क व लोकशाहीचा जागर म्हणजे मतदान. मतदान हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे आणि त्यासाठी लोकांचा आवाज असणे आवश्यक आहे. प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे, याचा अर्थ सर्व भारतीय त्यांच्या पसंतीच्या व्यक्ति ला मतदान करू शकतात. तुम्ही बदल घडवू शकता आणि तुमच्या समाजात बदल घडवू शकता तसेच मतदानाचे विविध नियम या आगळ्या वेगळ्या पध्दतीने समजून सांगत आहेत मतदान 100% लोकांनी करावे असे आव्हान बोलका बाहुला गंगाराम व गुंगुबाई जनतेला करित आहे ग्रामीण भागात जावून महिला मतदान जनजागृती मोहीमेत – सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी देशभर वाढावी म्हणून निवडणूक आयोगाने एक अनोखी मतदार जागृती अभियानाची संकल्पना मांडली असून, त्याअंतर्गत प्रत्येक राज्यात काम सुरु करण्यात आले आहे. पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) असे या योजनेचे नाव आहे.
यामध्ये मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी, मतदार यादीतील तपशील दुरुस्त करणे आणि स्थलांतरित आणि मृत कुटुंबातील सदस्यांचे नाव हटविण्यासंबंधीच्या प्रक्रियेबाबत मतदारांना शिक्षित करण्यासाठी राबवले जातात.तसेच ऑनलाइन, ऑफलाइन सुविधांद्वारेशिक्षित करण्यासाठी राबवले जातात.तसेच ऑनलाइन, ऑफलाइन सुविधांद्वारे मतदान कसे करावे, निवडणुकीदरम्यान भ्रष्ट प्रथा रोखण्यासाठी निवडणूक यंत्रणेला कशी मदत करावी इत्यादींची माहिती दिली जात आहे.या प्रसंगी मतदान जनजागृती कार्यक्रमाला गावकरी महिला तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस आशा मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.
Add Comment