Articles Front Maharashtra crimes Travel

संपादकीय : वाहतूकीचा वाढलेला दंड योग्य की अयोग्य, सखोल विश्लेषण !

सरकार चा निर्णय कटू पण योग्य !

 

संपादकीय | काही दिवसांपासून आपण पाहतोय वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. पण ती का ? वाढवली याच स्पष्टीकरण ही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिल आहे. तरी ही प्रसारमाध्यम आणि सोशल मीडिया वर चुकीच्या बातम्या आणि पोस्ट टाकून यातून वेगळा अर्थ काढून विनाकारण यावर चर्चा घडवण्यात येत आहे.

खर तर रस्ते अपघात कित्येक नागरिकांचे केवळ वाहतूक नियम न पाळल्या मुळे प्राण जातात. अनेक अपघातात काही ही चूक नसताना केवळ वाहन चालवणाऱ्या च्या चुकी मूळे अक्ख कुटुंब मृत्यू पावलेल्या बातम्या आपण ऐकतो व वाचतो ! ही मग विचार करा की सरकार ने हे जे नियम बनवले आहेत. ते का ? बनवले असतील. यात नियम बनवताना सरकार आणि त्यांच्या टीम ने हा विचार केला नसेल का ? ही रक्कम खूप जास्त आहे म्हणून ? आपल्याला कळतंय मग त्यांना हे समजत नाही का ? ह्या वर विचार करा उत्तर ही मिळेलच !

खर तर अनेक उपाय योजना करून आणि जनजागृती करून ही वाहतूक नियम पाळले जात नाहीत. दंडाची रक्कम किरकोळ असेल तर त्या नियमाकडे कुणी ही गंभीरपणे पाहत नाही. काय होईल हवं तर पकडलं तर हवलंदार 100 दिले की सोडून देईल अथवा शे दोनशे ची पावती भरावी लागेल इतकंच ना. अशी जनतेची आणि खास करून तरुनवर्गाची झाली होती. आणि जास्त बळी हे ह्या तरुण वर्गाचे अपघातात जात होते. त्यातून तरुण कमावता घरातला गेला तर त्या कुटुंबातील बाकी लोकांना जगणं मुश्किल होऊन जातं हे सांगण्याची गरज नाहीं. हे कुठं तरी थांबलं पाहिजे जनतेने स्वतः होऊन नियम पाळले असते तर आपल्या सरकार ला हे नियम कडक करावे लागले असते का ? हे जरा स्वतःला ही विचारा. मग समजेल.

आणि सरकार कुठे म्हणतंय तुम्ही दंड भरा सरकार म्हणताय तुम्ही वाहतूक नियम पाळा म्हणजे तुम्हाला दंड भरण्याची वेळ येणार तर नाहीच. परंतु नाहक अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या ही कमी होऊन अपघाताचे प्रमाण ही कमी होईल. सरकार हे जनते साठी असत आणि जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय भले ही आज कटू वाटत असतील पण वाहतुकीला व अपघात रोखण्यासाठी व शिस्त लावण्यासाठी उचललेलं पाऊल हे नक्कीच स्वागतार्ह आहे.

अनेक जण म्हणतील यात आता उलट भ्रष्टाचार वाढेल पण जर तुम्ही वाहतुकीचे नियम पाळले तर तुम्हाला का ? हवालदार अाडवेल आणि चूक नसताना कुणी का पैसे देईल हे समजून घेतलं पाहिजे. उलट नियम पाळले तर नक्कीच कित्येक प्राण वाचतील दंड भरू शकता पण आपल्या चुकी मुळे गेलेले प्राण येऊ शकत नाही . हे लक्षात घ्या !

आणि तुम्ही वाहतूक नियम पाळणारे असाल तर स्वागतच करा कारण नियम पाळले तर वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि अकाली अपघातात प्राण गमावण्याची वेळ सहजपणे कुणावर येणार नाही.

Featured

Advertisement