कृषीवार्ता : सध्या शेती करणे हे शेतकऱ्याला परवड नाही. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत. त्याला कारण ; बी – बियाणे, रासायनिक खते, कीटक – नाशके यांच्या वाढत्या किंमती आहेत. आणि यातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही.
रासायनिक खते काही दिवसापूरतेच फायदेशीर राहतात. नंतर सारखी – सारखी खते टाकावी लागतात. त्यामुळे उत्पादनापेक्षा खतांचाच जास्त खर्च होत आहे. या सर्व गोष्टींसाठी आपण सेंद्रिय खत वापरणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत दोन – तीन वर्षांपर्यंत चालतो.
जमीन चांगली राहते. वारंवार खतांच्या खर्चात बचत होते. शेती मालाची गुणवत्ता पण सुधारून त्याला योग्य दर ही मिळतो. शिवाय रासायनिक खता मधून जे शाररिक नुकसान होते. ते ही हळू – हळू कमी होईल.
शेतकरी तानाजी चव्हाण
संपर्क : [email protected]
Add Comment