Articles Front Maharashtra Politics

संपादकीय : जाहिरात करा पण जपून

संपादकीय : गड किल्ले यावरून प्रसिद्धी माध्यमातून ज्या काही बातम्या  प्रसिद्ध झाल्या त्या वरून सरकारला खास करून मराठा समाजाने जो काही विरोध दर्शवला ह्या विरोधाला शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातून स्पष्टीकरण दिलं आहे.  मराठा समाजात सरकार विरोधात कमालीची संतापाची लाट निर्माण झाली आहे.

खर तर ह्या सरकारला काम कमी आणि जाहिरात बाजी जास्त यामुळे अनेक ठिकाणी तोंडघशी पडण्याची वेळ आलेली आहे. तरी हे सरकार ला अनेक वेळा समजलं आहे.   हा निर्णयाचं खापर विरोध झाल्यावर प्रसिद्धी माध्यमावर फोडण्यात काय अर्थ आहे ? मुळात हा निर्णय घेताना जनतेला विश्वासात घेता का ? गैरसमज होणार नाही. याची काळजी घेतली जाते का ? हे पाहणं सरकारच काम असून  चुकीच्या आणि असंवेदनशील निर्णयामुळे जनभावना दुखावल्या जातात. हे सरकारला माहीत नाही काय ? की मुद्दाम जाणून बुजून वातावरण तापवण्यासाठी असले निर्णय घेतले जातात ?

पर्यटनमंत्री संबंधित खात्याचे सचिव व खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बाबतीत स्पष्टीकरण देणं भाग पडत असेल तर चुकीच्या बातम्या बाहेर जातात कशा हा ही एक वेगळा विषय आहे.

जनभावना दुखवायच्या आणि मग पुन्हा त्यावर फुंकर घालून आमचं सरकार अस करणार नव्हतं अस म्हणत जनतेची काळजी करणार सरकार आहे असं दाखवत असाल तर हे सरकारला विधानसभा निवडणुकीत खूप महागात पडेल.

गड किल्ले ही मराठा समाजाचीच नव्हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेची अस्मिता आहे. प्रत्येकाच्या ह्रदयात ह्या ठिकाणा बद्दल एक वेगळी आत्मीयता तर आहेच पण एक वेगळा अभिमान आणि स्वाभिमान ही आहे.  आणि तो जर दुखावला गेला तर धमन्यातील रक्त सळसळणार हे कुणी जोतिष्याने सांगण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांनी सांडवलेल्या रक्तातून हे गड किल्ले पवित्र झाले आहेत. त्याग आणि बलिदान याचा ज्वलंत इतिहास ह्या पवित्र गड आणि किल्ल्याना असल्या मुळे  मराठी मन कमालीचं दुखावलं गेलं. त्यातूनच मग वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आणि खुद्द मुख्यमंत्री साहेबांना  स्पष्टीकरण देण्याची वेळ आली असली तरी जनभावना दुखावली गेली तीच काय ?

त्यामुळे साहेब निर्णय घेताना जाहिरात करा. पण योग्य करा अन्यथा स्पष्टीकरण देण्याची वेळ येते हे विसरू नका. मागे ही वृक्ष लागवडी बाबत च्या जाहिरातीवर ज्यांनी खरोखर एक झाडा साठी चळवळ उभारली त्या सयाजी शिंदे यांच्यावर दबाव आणून चूक झाली. अस म्हणण्यास लावलं खर  पण तुमच्या अश्या चुकाच खापर  प्रसिद्धी माध्यमांवर फोडणं कितपत योग्य आहे. हे तुम्हीच ठरवा. अन्यथा विधानसभा जवळ आल्या असून कुणाला सत्तेत बसवायच हे जनता ठरवेल.

Featured

Advertisement