छाया :जुबेर शाह
प्रतिनिधी : गोळेगावं
सिल्लोड तालुक्यामध्ये नगदी पीक म्हणून मिरची पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळाले आहे. पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत कोकोपीठ मध्ये ट्रे पद्धतीत रोपे तयार करून मल्चिंग पेपर वर लागवड सुरु केली आहे.
सध्या ढगाळ वातावरणात रोपांची वाढ योग्य ती करून बाजारभाव चांगला मिळवता यावा यासाठी शेतकरी मिरची पिकांची लागवड करण्यात व्यस्त आहे.
सिल्लोड तालुक्यातील शिवणा, पानवडोद, गोळेगावं, आमठाणा, हळदा शिवारात मे १५ पर्यंत मोठ्या प्रमाणात मिरची लागवड होणार आहे.
पूर्व हंगामी मिरची लागवडीसाठी एकरी जवळपास ६० हजार रू. मिरची पीक हातात घेईपर्यंत खर्च येतो.
“शेतीची चांगली मशागत करून बेड काढून मल्चिंग पेपरचे अच्छादन करावे लागते, त्यांनतर रासायनिक खत टाकून मग मिरची लागवड करावी लागते यासाठी जवळपास ६०, हजार रुपये खर्च येतो”
– शेतकऱ्यांनी एकरी मिरची लागवडी पूर्वी द्यावयाची खताची मात्रा
– १०:२६:२६ ४ बॅग
– बोर्याकॉल १० किलो
– १०:५१० २ बॅग
– सल्फर १० किलो ( बेन्टोनाईट )
– रेफरी जी आर ५ किलो
– थायमेट ५ किलो
– झिंक १० किलो
– निंबोळी पेंड ८० किलो
Add Comment