प्रतिनिधि सिल्लोड
काल झालेल्या अवकाळी पाऊसामुळे सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरातील डिग्रस शिवारात वीज पडून एक जण ठार झाल्याची घटना काल दुपारी दि.२४ साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. यात अनिल कडुबा साळवे यांचा जागीच मृत्यू झाला. अनिल कडुबा साळवे यांची अजिंठा दिग्रस शिवारात गट नं 160, मध्ये शेती आहे काल दुपारी ते शेतीचे काम करत असतांना अचानक वादळी वाऱ्या सह अवकाळी पाऊस पडला व यात त्यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला.तर सिल्लोड तालुक्यातील पानवडोद सह परिसरात गारी पडल्या.
Add Comment