लोकशाही व्यवस्थेत जर विरोधी पक्ष आपलं अस्तित्व गमावून बसत असेल तर ती बाब लोकशाहीच्या दृष्टीने अजिबात हितावाह नाही. कारण लोकशाही व्यवस्थेत न्यायव्यवस्था ,प्रशासन, पत्रकारिता आणि लोकनियुक्त सरकार जरी कणा असला तरी त्यावर खऱ्या अर्थाने वचक ठेवण्याच काम हा विरोधी पक्ष करत असतो. सरकारच्या चुका जनतेसमोर मांडून सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याच काम विरोधी पक्ष करत असतो.परंतु आज देशात आणि राज्यात ही विरोधी पक्ष पुर्णतः उध्वस्त झाला आहे असं म्हंटल तर अजिबात वावग ठरणार नाही.
आज महराष्ट्रात विरोधीपक्ष्याला पूर्ण घरघर लागली असून जो तो सत्तेच्या होडीत बसून आपण बुडणार नाही ना?याची काळजी घेतोय. आणि सत्ताधारी ही त्यांना बिनदिक्कत बेरजेचे राजकारणात सगळं माफ म्हणत बिनधास्त आपल्या नावेत बसवून घेण्यास तयार आहेत.खर तर इथेच लोकशाही कमकुवत होत असून ह्या राजकारणी मंडळीच फावत आहे.
आपापली वेगवेगळी संस्थान निर्माण करून त्या ठिकाणी ते म्हणजे सरकार असा दबदबा निर्माण केलाय.अशी बरीच नेते मंडळी आहेत. जे जिकडे सत्ता तिकडे असतात त्या मुळे नेहमी सत्तेच्या जवळ असल्या मुळे किती ही आणि कसे ही वागले तरी आपलं कुणीच काही करू शकत नाही हा समज त्यांचा मनात पक्का झाला आहे. यातूनच मग किती ही घोटाळे केले तरी हे सत्तेच्या जवळ असल्या मुळे चौकशी देखील साधी होत नाही.आणि हेच जनतेला अजून कसं समजत नाही हे समजण्या पलीकडील असून.आज जे सतत सत्तेच्या जवळ असणारे राष्ट्रवादी वाले सत्ता येत नाही असा अंदाज दिसताच सत्ताधारी कळपात जाऊन धुतल्या तांदळा सारखे स्वच होत आहेत .
युती किती जरी म्हणत असली आमच्याकडे स्वच्छ करण्याची वॉशिंग पावडर नाही तरी ही ह्यांना का घेत आहेत.फक्त सत्तेची गोळाबेरीज जमली पाहिजे इतकं सोपं बाब जनतेच्या लक्ष्यात येत नाही का ? तर त्याच उत्तर आहे ही बाब जनतेच्या लक्ष्यात येते पण कळत पण वळत नाही. तशी गत जनतेची झाली आहे. लोकशाही जर कमकुवत होत असेल तर तिला जबाबदार ह्या दलबदलू नेत्या पेक्ष्या मतदार जबाबदार आहेत.कारण ती सवय तुम्ही लावली आहे.
लोकशाही जर मजबूत आणि सक्षम करायची असेल तर मजबूत विरोधी पक्ष हवा त्यासाठी
चांगले लोकप्रतिनिधी विधानसभेत गेले पाहिजे नवीन नेतृत्व पुढे येऊन त्यांना ही संधी दिली पाहिजे. अन्यथा जनता फक्त पाहत राहील आणि आपल्या डोळ्या समोर आपली लोकशाही कमकुवत होत जाईल.
Add Comment