Articles Editor Choice Politics

संपादकीय : भाजप मेघा भरती सुरूच, मात्र कार्यकर्ते नाराज !

संपादकीय : भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचा फुगत चाललेला फुगा आज साताऱ्यात भाजप कार्यकर्त्यांनी फोडला आहे. सरळ सरळ शिवेंद्रसिंहराजे यांच्या उमेदवारी ला विरोध करत दीपक पवार यांना पाठिंबा जाहीर केलाआहे यातून एक बाब प्रकर्ष्याने समोर येत असून ज्यांनी खरा भाजप पक्ष वाढवला त्यांना जर डावलत असाल तर तळातील कार्यकर्ते नाराज होणार आहेत.

गेली कित्येक वर्षे ज्यांच्या विरोधात राजकारण केलं पक्ष्या ची ताकत कमी असताना ह्या मतब्बर मंडळी विरोधात लढून पक्ष वाढवला आणि आज हे सत्तेसाठी पुन्हा इकडे येऊन आमचे नेते होणार ही भावना कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या पचनी पडत नाही यातूनच हा साताऱ्यातील प्रकार समोर आला आहे.

आणि इथून पुढे बशुतांश मतदार संघात जिथे इन्कमिंग झालय तिथले कार्यकर्ते ही व्यथित असून त्यांच्या मनात आपल्यावर अन्याय होतोय ही भावना वाढीस लागली आहे.हे लोण संपुर्ण महाराष्ट्र भर पसरलं आणि विरोधकांनी शांत डोक्याने अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांशी जवळीक निर्माण केली तर युतीच्या बाजूंनी वाहणारे हे वारे बदलू शकत असा अनेक राजकीय जाणकार व्यक्ती बोलत आहेत.

नुसती भर्ती चालू असून जे आहे त्यांचे काय ? त्यांचा जर विचार आणि मत भाजप ने समजून घेतलं नाही तर हिच इन्कमिंग भाजप ला सत्तेतून आऊट करून टाकणार हे मात्र नक्की.

निवडणूक ही पदाधिकारी कार्यकर्ते आणि गावो गावी असणार पक्ष संघटन मजबूत असेल तर मतदारसंघात लोकांच्या पर्यंत पोहचण्यासाठी सोपं जातं पण आणि स्थानिक पातळीवर जो वर ज्यांना विरोध केला त्यांच्या साठी झेंडे घेऊन फिरायचं का?असा विचार अनेक कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होऊन तो पक्ष कार्य करत नाही अथवा आपल्या वर अन्याय झालाय ना मग आपण ही चला दुसऱ्या पक्ष्यात अस म्हणत सरळ सरळ बंड करून उठतो भले ही गाव पातळीवरील ही बंड छोटी असतात परंतु यांच्या जीवावर निवडणुका जिकल्या जात असल्या मुळे जो ही व्होती बंड थोपवू शकतो तो निवडून येऊ शकतो अन्यथा भाजप आणि सेनेचा डाव त्यांवह्यावर उलटू शकतो .कारण हे जण मत आहे युती ने जो पवित्र आणि स्वच्छ करून घेण्याचा सपाटा लावलाय त्यास आता जनतेतून हळू हळू विरोध होत आहे.आणि हा विरोधच मत पेटीतून युतीच्या विरोधात पडला तर मात्र युतीची गत ……. तेल ही गेलं आणि तूप ही गेलं हाती धुपाटन आलं अशीच होईल.

Featured

Advertisement