इंग्लंड आंणि ऑस्ट्रेलिया मध्ये ॲशेस मालिकेतील पाचवा सामना चालु असुन दोन दिवसाच्या खेळानंतर सामना रंगतदार स्थितीत आला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात २९४ धावा केल्यानंतर जोफ्रा आर्चरने सहा विकेट घेत इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी मिळवुन दिली. जबरदस्त फाॅर्म मध्ये असलेल्या स्टीव्हन स्मिथने मात्र कडवी झुंज देत तळाच्या फलंदाजाच्या साहाय्याने ऑस्ट्रेलियाचा डाव २२५ धावांपर्यंत नेला. स्मिथने एक षटकार व नऊ चौकाराच्या साहाय्याने ८० धावा केल्या.
इंग्लंड कडुन पहिल्या डावात जाॅस बटलर व कर्णधार रुटने अर्धशतकी खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शने पाच, पॅट कमिन्सने तीन व हेजलवुडने दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात स्मिथ व्यतिरिक्त लाबुस्चाग्नेने ४८ धावा केल्या. इंग्लंडकडुन जोफ्रा आर्चरने सहा, सॅम करनने तीन व वोक्सने एक विकेट घेतली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ चालु झाला असताना इंग्लंड बिनबाद ३७ धावांवर खेळत असुन इंग्लंडकडे यावेळी १०६ धावांची आघाडी आहे.
Add Comment