मुंबई | चहाचे उत्पादन आसाममध्ये जरी होत असेल तरी त्या चहाचे विविध प्रकार आपल्याला महाराष्ट्रात भेटतात. अनेक चहा वाल्यांच्या वेगवेगळ्या शाखा ही आल्या आहे. आणि त्यातून चहाला प्रसिद्धी ही मिळत आहे.
असाच एक वेगळा चहा आम्ही आपल्या माहिती साठी शोधून काढला असून सि, बी, डी बेलापूर सेक्टर 11 येथे पोखरकर बंधूंचा तंदूर चहा जर बेलापूर नवी मुंबईला आले तर जरूर पिऊन पहा !
बऱ्याच वर्ष नोकरी केल्या नंतर नोकरीत मन रमत नसल्या मुळे कुठंतरी स्वतःचा छोटा का असेना पण व्यवसाय हवा हे स्वप्न उराशी बाळगून ओतूर, ता. जुन्नर येथील पोखरकर बंधूनी शिवनेरी नावाचा तंदूर चहा चा व्यवसाय सुरू केला आहे. बडे – बडे चहा वाले असून ही हा अल्पावधीत बेलापूर मद्ये कमालीचा लोकप्रिय झाला आहे.
मातीच्या मडक्यात चहा बनवण्याची इथली आगळी वेगळी पद्धत आणि ह्या चहा ची अफलातून असणारी चव ह्या मूळे चहा प्रेमी आपसूक इकडे ओढले जात आहेत.
त्या साठी लागणारे साहित्य छोटी मटकी पोखरकर बंधू खास गावावरून बनून घेत आहेत. त्या मुळे त्यांच्या ह्या कल्पनेतून बनला गेलेल्या चहा ला लागणार कच्चा माल म्हणजे मडकी ती बनवण्यासाठी गावी ही दोन तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे. रोजगार करण्या पेक्ष्या रोजगार देणार होणं मला आवडत हे त्यांनी सांगितलेलं वाक्य अनेक मराठी तरुणांच्या मनात घर करून जात आहे.
असा हा आगळा वेगळा चहा बेलापूर ला आले का पहा पण नोकरीत तुटपुंज्या पगारावर भागत नाही. अस म्हणण्या पेक्ष्या तुम्ही ही पोखरकर बंधू कडून काहीतरी आदर्श घ्या. आणि तरुणांनो नोकरीच्या मागे न धावता काहीतरी नावीन्य शोधून व्यवसाय करा.
शेवटी हिम्मत है मर्दा तो मदत दे खुदा…हे अगदी सत्य आहे.
Add Comment