Editor Choice Sports

ॲशेस: चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय

 

मुंबई | स्टीव्हन स्मिथची धडाकेबाज फलंदाजी आणि गोलंदाजांनी केलेल्या टिच्चुन माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथा सामना १८५ धावांनी जिंकला. चौथा सामना जिंकत पाच सामन्याच्या ॲशेस मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली व मालिका जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या.

इंग्लंडच्या फलंदाजांनी सामना अनिर्णित करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. इंग्लंडकडुन डेन्लीने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. जॉस बटलर व ओवरटर्नने सामना वाचण्यासाठी चांगले प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाकडुन कमिन्सने ४, हेजलवुड व लायन्सने प्रत्येकी २, स्टार्क व लाबुस्चाग्नेने प्रत्येकी १ विकेट घेतली. स्टीव्हन स्मिथला सामनावीर म्हणुन गौरवण्यात आले.

Featured

Advertisement