मुंबई| ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये चालु असलेली अॅशेज मालिका रंगतदार स्थितीत आली आहे. पहिल्या तीन सामन्यात ऑस्ट्रेलिया व इंग्लंडने प्रत्येकी एक एक सामना जिंकला आहे. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४९७ धावा करत डाव घोषित केला व इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. अडखळत झालेलूया सुरुवातीनंतर जबरदस्त फाॅर्म मध्ये असलेल्या स्टीव्हन स्मिथने द्विशतक झळकावत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. स्मिथला लाबुस्चाग्ने, टीम पेन, स्टार्कने अर्धशतकं करत चांगली साथ दिली. स्मिथच्या कारकिर्दीतील हे २६वे शतक तर तिसरे द्विशतक ठरले आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वाॅर्नर मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरला, तो दुसऱ्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. स्मिथने ३१९ चेंडुंचा सामना करताना २४ चौकार व दोन षटकारांच्या साहाय्याने २११ धावा केल्या. इंग्लंड कडुन स्टुअर्ट ब्राॅडने तीन, लीच,ओवरटर्नने प्रत्येकी दोन व रुटने एक विकेट घेतली. दुसऱ्या दिवशी खेळ संपला त्यावेळी इंग्लडने २३ धावा करत एक फलंदाज बाद झाला होता. सलामीवीर डेन्लीला कमिन्सने स्वस्तात माघारी पाठवले. तो ४ धावा करत बाद झाला.
Add Comment