संपादकीय : पवार साहेब म्हणजे संयमी व्यक्तिमत्व कधीच सहसा कुणावर चिडणार नाही. की कुणावर भडकणार नाहीत. परंतु कधी न भडकणारे पवार साहेब ज्या वेळी पत्रकाराने त्यांना प्रश्न केला साहेब… आपले नातेवाईक आपणास सोडून जात आहेत ? त्यावर पवार साहेब त्या पत्रकारावर चिडलेच परंतु पत्रकार परिषदेतून उठून जाण्यास निघाले व त्या पत्रकाराला माफी मागायला सांगत होतो असा तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. पवार साहेब का ? बरं असे वागले असतील ?
नातेवाईक असो की अनेक नेते असोत पवार साहेबांनी यांना खूप मोठं केलं कित्येकांची संस्थान उभारून दिली आणि सतत सत्तेची चवदार फळ चाखू ही दिली आणि आज हेच ज्या वेळी पवार साहेब यांना सोडून जात असतील तर त्रास हा होणार ना ? आणि पत्रकाराने जो प्रश्न विचारला त्या प्रश्नावर साहेब इतके का ? बरं चिडले त्याच उत्तर जर शोधलं तर पत्रकार फक्त निमित्त मात्र झाला असून खरा राग हा साहेबांचं त्या त्या नेत्यावर आणि नातेवाईक यांच्या वर होता परंतु फक्त म्हणतात ना कधी कधी वड्याचे तेल वांग्यावर निघते तशातला हा प्रकार झाला असून साहेब आपण जाणते नेते होतात.
परंतु आपणास ह्या वेळी मात्र अंदाज समजला नाही.
आणि आपली जी महाराष्ट्रात ताकत होती हीचा वापर आपण अगदी विरोधी पक्षाच्या नेत्यास असो की कधी आपल्याच पक्ष्याच्या नेत्यास ही पाडण्यात वापरत असत. आणि ह्या धक्का तंत्राला नेते तुमच्याच काय पण विरोधी पक्ष्याचे नेते ही घाबरत असत पण आता तुमचा तो प्रभाव उरला नाही त्यामुळे तुम्ही आधार दिलेले कित्येक जण तुम्हाला बेजार करत आहेत.
साहेब लोकसभा निवडणुकी दरम्यान आपण काही जागा बाबत जो हट्टहास केला त्यामुळे जवळ जवळ तीन चार जागा येणाऱ्या आपण हरला तर आहात पण जे तुमचं दबाव तंत्र होत ते पूर्ण विस्कळीत झालं आहे.
नगर ची जागा काँग्रेस ला सोडली असती तर नगर मधून दोन्ही ही जागा येत होत्या तसेच माढा ही मोहिते पाटील यांना दिली असती तरी तिथला पराभव टाळू शकत होता. पण साहेब काही ठिकाणी आपण भ्रमात राहिलात जुन्या खेळी इथे नवीन मैदानावर नव्या खेळाडू नि बरोबर ओळखून चेंडू सीमा पार तर धाडलाच परंतु आपल्या गोलनदाजीची धार पूर्णतः बोथट करून टाकली.
साहेब फक्त नेते निर्माण केले आपण.आणि कार्यकर्ते मात्र सतरंज्या उचलत राहिले त्यामुळं सगळीकडे व्यक्ती केंदी राजकारण निर्माण झालं आपल्या पक्ष्यात आणि हेच आपणास आज त्रास देत आहे.आपल्या पक्ष्यात फक्त नेते मोठे झाले त्यांची पोर मोठी झाली गणेश नाईक सारख्या नेत्यांच्या घरात सगळी पद होती .,महापौर. आमदार खासदार.का नाही इतर पर्याय उभा केला तस केलं असत तर आज नविमुंबईत पालिकेत तरी किमान सत्ता वाचली असती आज काय अवस्था आहे.
तिथे आपल्या पक्ष्याची तसच सगळीकडे झालं असून आत्मपरीक्षण केलं की सगळी उत्तर भेटतील.
Add Comment