दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारणीचा आग्रह पुन्हा एकदा नाकारल्यानंतर आज सोनिया गांधीची हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसची मोठी हानी झाली आहे. मरगळलेल्या काँग्रेस मध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे मोठे आव्हान नविन अध्यक्षांपुढे असणार आहे. हंगामी अध्यक्ष्यांच्या निवडीची माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेत गुलाब नबी आझाद यांनी दिली.
महाराष्ट्रासह काही महत्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना अध्यक्षाची निवड होत नव्हती त्यामुळे काँग्रेसच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण होते. विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांच्यासमोर भाजपाला पराभूत करण्याबरोबरच पक्षाची ताकद वाढवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
आज सकाळी काँग्रेस मुख्यालयात सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियांका गांधी उपस्थितीत बैठक झाली होती. आज काँग्रेसचा अध्यक्ष निवडला जाईल अशी सकाळपासुन चर्चा होती. सकाळपासुन काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवरुन काँग्रेसला सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले.
Add Comment