Travel

एसटी महामंडळाला गावाचे वावडे”,अबोल वृद्धाना करावी लागते आर्धा kolkimi

 

एसटी महामंडळाला गावाचे वावडे

अबाल वृद्धांना करावी लागते अर्धा किलोमीटर पायपीट‌.

सिल्लोड प्रतिनिधी : सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड ते कन्नड मार्गांवर आमठाणा हे गाव असून गावापर्यंत जा -ये करण्यासाठी कच्ची सडक आहे. परंतु सदरील सडकेचे डांबरीकरण अद्याप झालेले नाही, राज्य परिवहन महामंडळाची ही बस आमठाणा फाट्यावरचं प्रवाश्याना सोडून बस कन्नड दिशेने निघून जाते जाते.अश्यावेळी अबाल वृद्धाना मात्र फाट्यापासून गावा पर्यंत पायपीट करत यावे लागते. यामुळे गावातील संतापलेल्या नागरिकांमध्ये एकूणच रोष वाढत चालेला आहे. गतवर्षांमध्ये
एकीकडे राज्य सरकारने 75 वर्षावरील जेष्ठ वयोवृद्ध नागरिकांना बस प्रवास मोफत करण्याची सवलत दिली असतांना देखील दुसरीकडे मात्र एस टी महामंडळाचे कर्मचारी त्यांच्या सोबत जाणूनबुजून हेळसांड करण्याच्या उद्देशाने हेतूपरस्पर त्रास देत असल्याचे चित्र बघायाला मिळत आहे. सिल्लोड तालुक्यातील राज्य परिवहन महामंडळाची बस ( लाल परी ही सिल्लोड ते कन्नड असा प्रवास करते. किंव्हा सिल्लोड ते घाटनांद्रा अशी जाते. यावेळी अबोल वयोवृद्धाना चक्क आमठाणा फाट्यावर सोडून बस निघून जाते.
अश्यावेळी आमठाणा गावं ते असलेला फाट्याच अंतर हे जवळजवळ सुमारे दोन किमी आहे.त्यामुळे शाळकरी बालके तथा वृद्ध नागरिकांना गावात येण्यासाठी डोहीजड पायपीट करावी लागते .त्यामुळे हा अंत्यन्त तंटात्मक दैनंदिन चिंतेचा विषय झाला आहे.प्रवाशांनी गावात सोडण्याची विनंती केल्यास,एकीऱ्या भाषेत बोलत हेकेखोर ठेकेदारा वागणूक दिली जाते. हा प्रकार महामंडळाने वेळीच थांबवून वयोवृद्धासाठी बस सेवा गावापर्यंत सुरु करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जातं आहे.