जळगांव प्रतिनिधी
अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना निवेदन देताना फारूक शेख, सोबत मतीन पटेल, मजहर खान,अन्वर खान आदि दिसत आहे
प्रतिनिधी जळगांव
“हम दो हमारे बारह” हा हिंदी (सिनेमाचे ट्रेलर)चित्रपटाची झलक व पोस्टर (भित्तीपत्रिका )प्रसिद्ध होताच त्यात जे पवित्र कुराणाचे श्लोक व अंतिम प्रेषिता चे जीवन चरित्रावर केलेले गंभीर आरोपा सह मुस्लिम स्त्रियांवर कशाप्रकारे पुरुष अन्याय करतात, त्यांच्याशी वैवाहिक सुख प्राप्त करण्यासाठी त्यांना कशा वेदना देतात, त्यांना मारहाण करतात व हे सर्व ते कुराणाच्या आदेशाने करतात अशा प्रकारचे खोटे आरोप लावून सदर सिनेमा तयार करण्यात आल्याचे सिनेमाच्या ट्रेलर (झलक) वरून दिसून येत आहे.
सदर चित्रपट प्रदर्शित (रिलीज)होता कामा नये म्हणून जळगाव येथे मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी, जळगाव अंकुश पिनाटे मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एक तक्रार अर्ज सादर केले असून त्यानुसार केंद्रीय फिल्म प्रमाण बोर्ड द्वारा राज्य सरकार चलचित्र अधिनियम 1952 च्या कलम 12 अनुसार जर काही समाजाच्या लोकांनी सिनेमा बाबत निंदनीय तक्रार (ऑब्जेक्शन)घेतल्यास त्या चित्रपटाला प्रदर्शित ( सिनेमाला रिलीज ) करता कामा नये अथवा त्यातून निंदनीय (ऑब्जेक्शनल) दृश्य व सवांद (डायलॉग) कमी करण्यात यावे कारण आवश्यक असल्याचे कायद्यात तरतूद असल्याने त्यानुसार महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली.
सदर सिनेमावर बंदी न आल्यास तो चित्रपट सिनेमा गृहात (थिएटरमध्ये )प्रसिद्ध झाल्यास त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्यास सर्वस्वी चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माता , निर्देशक, कलाकार व सरकार जबाबदार राहील असे सुद्धा निवेदनात म्हटले आहे.
*सदरचे निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या*
“जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरी चें अध्यक्ष फारुख शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मजहर पठाण, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष युसुफ खान , ए यू सिकलिगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान , इमदाद फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पटेल व सामाजिक कार्यकर्ते अनीस शहा, साजिद सलमानी यांची उपस्थिती होती.”
Add Comment