Maharashtra crimes

दासखेड येथे जुगाराच्या अड्ड्यावर पाटोदा पोलीसाचा छापा

  1. छाया : गणेश शेवाळेपाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी गोपनीय माहिती मिळाल्याने अनमोल केदार यांनी आपल्या अधिपत्या खालील पोलीस निरीक्षक गाडे, काटकर, स. पो. नि.वाघ, पो. हे.कॉ.जायभाय, काकडे, पो. कॉ.कोळेकर, पठाण स्टाफ यांना सदरची माहिती कळवून पंचासह कारवाई करण्याकरिता तात्काळ घटनास्थळी रवाना करून पाटोदा तालुक्यातील दासखेड येथे नदीच्या बाजूला असलेल्या झाडाखाली जुगाराचा खेळ चालू असताना पाटोदा पोलीस स्टेशन स्टाफने अचानकपणे छापा मारला असता काही इसम चाहूल लागल्यामुळे मोकळ्या रानात पळु लागले असता त्यांचा पाटोदा पोलिसांनी पाठलाग करून पकडले सदरच्या ठिकाणी एकूण 12 आरोपी जुगार खेळ पैशावर खेळत असताना मिळून आले सदरच्या कारवाईमध्ये 1) पांडुरंग संदीपान कोकाटे वय 51 वर्ष 2) साहेबराव किसन कोकाटे वय 55 वर्ष 3) अनिल सिताराम कोकाटे वय 60 वर्ष 4) लक्ष्मण भगवानराव मोरे वय 38 वर्ष 5) दत्त्तात्रय बन्सीधर कोकाटे वय 44 वर्ष 6)) सुभाष शांतीलाल वाघीरे वय 56 वर्ष 7) दत्तात्रय बापुराव कोकाटे वय 48 वर्ष 8) हरीभाऊ भिमराव कोकाटे वय 52 वर्ष 9) प्रशांत आणासाहेब कोकाटे वय 44 वर्ष 10) गणेश मारोती कोकाटे वय 45 वर्ष 11) रमेश काकासाहेब कोकाटे वय 31 वर्ष सर्व रा. दासखेड ता. पाटोदा 12) अनिल विठठल बाबर रा. हिंगणी ता. करमाळा जि. सोलापुर यांना ताब्यात घेतले असून बेकायदेशीर रित्या पत्यावर पैसे लावुन स्वतःच्या फायदयासाठी तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना जुगाराचे साहीत्य, रोख 11240 रुपये व जुगार खेळण्यासाठी येणे जाणे साठी वापरलेल्या चार मोटार सायकल किमत 1,95,000 रुपये असा एकुण 206,240 रुपये सह मुद्देमालासह जप्तीची कारवाई करून सदर आरोपीतांविरुद्ध कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक माधव नारायण काटकर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पाटोदा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे..
    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मा.अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर. मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर,यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार,पोलीस उपनिरीक्षक भागवत गाडे,पोलीस उपनिरीक्षक माधव काटकर, सहाय्यक फौजदार बाळासाहेब वाघ,पोलीस हवालदार सुनील जायभाय, पोलीस हवालदार संतोष काकडे,पोलिस अंमलदार सचिन कोळेकर व रियाज पठाण यांनी केली असल्यामुळे पाटोदा पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे दोन नंबर क्षेत्रातील लोकांच्या मनात धडकी भरली आहे