Maharashtra crimes

नवसाला पावणारा गणपतीचा चांदीचा मुकुट व चांदीचा उंदीर चोरणारे दोन आरोपी अखेर जेरबंद

  •  पिशोर पोलीसांनी आरोपीच्या आवळाल्या मुसक्या

प्रतिनिधी : कन्नड -जावेद्दीन शेख

दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी देवपुल गांवातील नवसाला पावणारा गणपती मंदीरामधील गणपती बाप्पाच्या मुर्तीवरील १४,०००/- रुपये किंमतीचा २० भार वजनाचा चांदीचा मुकुट व गणपती बाप्पाच्या मुर्ती समोर असलेला गणपतीचे वाहन म्हणुन ओळख असलेला ४०,०००/- रुपये किंमतीचा ०१ किलो ग्रॅम वजनाचा चांदीचा उंदीर अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराध्याने चोरुन नेला आहे अशी तक्रार मंदीरातील पुजारी योगेश भावलाल घुगे रा. देवपुळ ता. कन्नड यांनी पोलीस ठाणे पिशोर येथे दिली होती. त्या वरुन पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरटयांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला होता.

पोलीस ठाणे पिशोर येथे उपरोक्त प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर, प्रभारी अधिकारी स.पो.नि.शिवाजी नागवे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन, वासडी बीट अंमलदार पंढरी इंगळे यांना तपासाच्या अनुषंगाने सुचना दिल्या होत्या. देवपुळ येथील नवसाला पावणारा गणपती मंदीरामध्ये सी.सी.टि.व्ही. फुटेज वरून गणपती बाप्पाचा चांदीचा मुकुट व चांदीचा उंदीर चोरी करणारे परमेश्वर पिका राठोड (आडे) रा. सितानाईक तांडा ता. कन्नड व रामेश्वर पंडीत चव्हाण रा. गव्हाली तांडा ता. कन्नड हे आरोपी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न करण्यात आले होते. आरोपी परमेश्वर पिका राठोड यांच्या विरुध्द छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा, जळगांव व जालना तसेच आरोपी रामेश्वर पंडीत चव्हाण यांच्या विरुध्द छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हयामध्ये चोरी व घरफोडीचे एकुण ०४ मालाविरुध्दचे गुन्हे दाखल असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

सदर गुन्हयांतील आरोपी परमेश्वर पिका राठोड (आडे) रा. सितानाईक तांडा ता. कन्नड व रामेश्वर पंडीत चव्हाण रा. गव्हाली तांडा ता. कन्नड यांचा तांत्रिक पुराव्यावरुन आज दि. २९ रोजी शोध घेतला असता, नमुद आरोपीतांनी देवपुळ येथे मंदीरामध्ये चोरी करण्यासाठी येतांना व जातांना वापरलेली युनिकॉन मोटार सायकल क्रमांक एमएच २० एम. व्ही. १२७४ हिच्या सह मिळुन आल्याने, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपिताना अटक करुन मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कन्नड यांच्या समक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने नमुद आरोपीतांची दि. ०१एप्रिल २०२४ पर्यत पी.सी.आर. दिलेला आहे. पी.सी.आर. कालावधी मध्ये नमुद आरोपीतांना विचारपुस करुन गुन्हयांतील चोरीला गेलेला गणपती बाप्पाचा चांदीचा मुकुट व चांदीचा उंदीर जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया अपर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार तथा उप विभागीय पोलीस अधिकारी कन्नड विजयकुमार ठाकुरवाड व स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक सतिष वाघ सारे यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. शिवाजी नागवे, पो.उप.नि. रतन डोईफोडे, बालाजी ढगारे, पोलीस अंमलदार पंढरी इंगळे, विलास सोनवणे, योगेश तरमळे, कौतिक सपकाळ, विजय भोटकर आदींनी केली आहे. अशी माहिती शिवानी जा. नागवे सहायक पोलिस निरीक्षक
पोलिस स्टेशन पिशोर ता. कन्नड यांनी दैनिक झुंजार प्रजातंत्र प्रतिनिधी जावेद्दीन शेख यांच्यासोबत बोलतांना दिली.