छ. संभाजीनगर
दैनिक झुंजार प्रजातंत्र वृत्तसेवा
◆ मातंग एकता आंदोलनाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार संदिप मानकर यांच्या पुढाकाराने पिडीत खंदारे परिवाराला न्याय मिळणार
सविस्तर माहिती अशी की, मातंग समाजातील रिक्षाचालक नामे विलास खंदारे हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. नेहमीप्रमाणे सातारा परिसरातील रेणुका माता मंदिर कमानीजवळ आपली रिक्षा लावत असतांना दुसरा रिक्षाचालक नामे कय्युम पटेल याने रिक्षा लावण्यावरुन त्यांच्याशी वाद घातला व वाद एकोप्याला गेल्यानंतर जातीवाचक व आई-बहिणीवरील शिवीने त्याचे पोट भरले नसल्याने त्याने रिक्षातील हत्यार काढून खंदारे यांच्या डोक्यात मारले व लाथा-बुक्क्यांनी त्यांच्या छातीत व पाठीवर मुक्का मार दिला सोबतच लोखंडी टामी काढून सुद्धा बेदमपणे मारहाण केली. समोरुन किमान 70 ते 80 लोकांचा समूह आणि इकडे हा एकटा असलेला विलास खंदारे… तेवढ्यात त्याचा छोटा भाऊ सोनू खंदारे त्याठिकाणी आला व त्याने तात्काळ आपल्या भावाला रिक्षात बसवीत सातारा पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी त्यांना अगदी हलक्यात घेतले व पुढील तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविले इतक्यात समोरील पटेल परिवाराला वाटले की हे आपल्यावर तक्रार दाखल करतील म्हणून आधीच त्यांनी खंदारे यांच्यावर 324 कलमाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर घाटी प्रशासनाने खंदारे यांची वैद्यकीय तपासणी सुरु केली असता त्यांच्या डोक्यांत मारलेल्या हत्याराच्या ठिकाणी 6 ते 7 टाके पडले व त्यांच्या छातीचा सिटीस्कॅन काढण्यात आला व हाताचा एक्सरे सुद्धा काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा ते सातारा पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल करण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना टाळाटाळ करीत तुमच्यावर आधीच समोरच्या पार्टीने 324 गुन्हा दाखल केला आहे अशी बोळवण करीत आता तुमची तक्रार घेतली जाणार नाही असे सांगितले. मात्र यानंतर पीडित परिवाराने पत्रकार तथा मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संदिप मानकर यांच्याशी संपर्क करुन घडलेली घटना सविस्तरपणे सांगितली यांवर मानकर यांनी स्वतः आपल्यासहित मनोहर घुले व राहूल अंभोरे आदी कार्यकर्त्यांसमवेत सातारा पोलीस ठाणे गाठून पीडित कुटुंबियांची भेट घेऊन घडलेला प्रकार माहीत केला व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.ब्रम्हा गिरी यांची भेट घेऊन त्यांना सर्व प्रकार कथन करुन अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली. त्यांवर त्यांनी यांसाठी मी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतो असे सांगत सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) रंजीत पाटील यांना पोलीस ठाण्यात बोलावून मानकर व पीडित परिवाराचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेत व प्रकरणाची शहानिशा करीत शेवटी रात्री उशिरा 11:40 वाजता फिर्यादी विलास खंदारे यांच्यावर हल्ला करणारे व त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणारे आरोपी कय्युम पटेल व सहआरोपी अशपाक पटेल यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती कायदा (ऍट्रॉसिटी) अंतर्गत कलम 324,, कलम 506,, कलम 34,, कलम 3 (1) (R),, कलम 3 (1) (S) आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील प्रकरणाचा पुढील तपास ACP रंजीत पाटील व पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस ठाणे करीत आहे.
“या झालेल्या प्रकरणानंतर पीडित खंदारे कुटुंबियांनी मानकर यांचे आभार मानले असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कुणीतरी उभे असल्याने समाधान व्यक्त केले..!”
Add Comment