आधारवड: प्राचार्य एन. बी. चापे गौरव ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी प्रास्ताविकात भूमिका मांडताना
सिल्लोड – आधारवड: प्राचार्य एन. बी. चापे गौरवग्रंथ सामुदायिक प्रयत्नांचे फळ आहे. ग्रंथ निर्मितीसाठी मी संपादक म्हणून निमित्तमात्र आहे. असे नम्र प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक आणि ग्रंथाचे संपादक प्रा. शिवाजी वाठोरे यांनी येथे केले. अल्पसंख्यांक विकास, औकाफ, पणन मंत्री अ. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रास्ताविक करताना प्रा. वाठोरे आपली भूमिका मांडत होते. सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून हरिभाऊ बागडे (नाना), प्रख्यात विचारवंत, माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. संजय गायकवाड, माजी आ. कल्याण काळे, जि.प. सदस्य सौ. पांडे, नगराध्यक्षा राजश्री निकम, बा.भो. शास्त्री आदी उपस्थित होते.
डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, मी माझ्या हयातीत एखाद्या प्राचार्याचा अमृत महोत्सवी समारंभ आणि ग्रंथ प्रकाशनाचा एवढा भव्य सोहळा पाहिला नाही. शैक्षणिक क्षेत्रातील प्रदुषणे नष्ट केल्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. हरिभाऊ बागडे (नाना), डॉ.संजय गायकवाड, बा.भो. शास्त्री, सौ.पांडे, सौ. निकम, पुंडलिक चापे (नाना ) आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्राचार्य चापे यांचा मान्यवरांचे हस्ते सपत्नीक हृद्य सत्कार करण्यात आला. मंत्री अ. सत्तार यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन प्रा. प्रशांत जोशी यांनी तर आभार कृष्णा लहाने यांनी मानले. सोहळ्यास उपनगराध्यक्ष अ. समीर अ. सत्तार, औरंगाबाद जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष अर्जुन पा. गाढे, विश्वासराव गाढे, सौ. मलिका चापे, प्राचार्य एस. टी. जगताप, देविदास पालोदकर, प्रताप प्रसाद, बा. भा. पंडित, प्रा. विजय पांडे, वकील संघाचे अध्यक्ष ऍड. अशोक तायडे, ऍड. संतोष झाल्टे, डॉ. प्रकाश नवाल, ऍड . विजयकुमार कस्तुरे, बी.एच. खरात, बबन महामुने आदींसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add Comment