महाराष्ट्र अपडेट | अजित पवार कुणाला काय?बोलतील याचा काही भरवसा नाही. काही दिवसांपान पूर्वी चंद्रकांत पाटील यांना चंपा असा टोपण नावाने उल्लेख केला तर उद्धव ठाकरे यांना उठा अस नाव त्यांनी दिल असून ही नाव सद्या राज्य भर गाजत आहेत.तेच अजित पवार यांनी अजून एका नेत्याला नाच्या म्हणून उल्लेख करत खिल्ली उडवली आहे.
मंगळवेढा येथे त्यांची प्रचार सभा होती ह्या सभेत बोलताना त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणा मूळे १६०० शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या तर कित्येक माता भगिनींना आपल कुंकुं पुसाव लागलं अशी खन्त बोलून दाखवली.
तर एके काळी त्यांच्या पक्ष्यात मंत्री असणाऱ्या लक्ष्मण ढोबळे यांच्यावर टीका करताना त्यांनी हलगी च्या तालावर झिंगाट असणाऱ्या नाच्या च्या नादी लागू नका म्हणत. ढोबळे यांना चांगलंच धारेवर धरलं. घरोबा बदलवणाऱ्या वर विश्वास ठेवू नका अस म्हणत त्यांनी समोर च्या पक्ष्या कडून उभे असणारे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यावर टीका केली.
सध्या अजित पवार यांची भाषण चांगली गाजत असून नेत्यांना टोपण नाव दिलेली ही सभेत प्रचंड हशा पिकवून जात आहेत.
Add Comment