india India TV 18 Sports

सराव सामन्यात पुजारा, रोहीत चमकले | indiatv18 मराठी

मुंबई / क्रीडा प्रतिनिधी : वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिकेपुर्वी कालपासुन तीन दिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली. सराव सामन्यात विराट कोहलीने विश्रांती घेतली आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर पाच गड्यांच्या मोबदल्यात २९७ धावा केल्या आहेत. सलामीवीर लोकेश राहुल व मयांक अगरवाल फारशी चमक दाखवु शकले नाहीत. ते स्वस्तात बाद झाले. लोकेश राहुलने ३६ तर मयांक अगरवालने १२ धावा केल्या. कसोटी संघाचा आधारस्तंभ म्हणुन ओळखला जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने मात्र आपण लयीत असल्याचे दाखवुन दिले आहे. शतक झाल्यानंतर तो निवृत्त झाला. सुरुवातीच्या पडझडीनंतर रोहित शर्माने पुजारासोबत शतकी भागीदारी करत भारताचा डाव सांभाळला. रोहीतकडुन चाहत्यांना शतकी खेळीची अपेक्षा असताना तो ६८ धावा काढुन बाद झाला. अजिंक्य रहाणे केवळ एक धाव काढुन बाद झाला तर रिषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. पंत ३३ धावांवर कार्टर कडुन पायचीत झाला. या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रविंद्र जडेजा १ तर हनुमा विहारी ३७ धावांवर खेळत होते.