पुणे / प्रतिनिधी : नारायण राणे यांनी सेना सोडून काँग्रेस मद्ये केलेल्या प्रवेशा बाबत राष्ट्रवादी पक्ष प्रमुख शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं स्पष्ट मत नोंदवलं असून ही नारायण राणे यांनी केलेली मोठी चूक होती अस ही म्हंटल आहे.
तर मी दिल्लीत असलो तरी लक्ष महाराष्ट्रात असून दिल्लीत मन लागत नसल्याची खंत राणे यांनी ही या वेळी बोलून दाखवली आहे
राणे पुन्हा महाराष्ट्रात येणार असा ह्या वरून अंदाज ही बांधला जातोय.
नारायण राणे यांच्या आत्मकथन प्रकाशन शरद पवार व गडकरी यांच्या हस्ते पार पाडण्यात आलं त्यावेळी ह्या दोघांनी ही नारायण राणे यांना खडे बोल सूनवत त्यांची स्तुती ही केली.कोकणातीतल छोट्या गावातून चेंबूर मधून सुरू झालेला राजकीय प्रवास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद ही नक्कीच भूषणावह बाब आहे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसता हे यश मिळवणं मुळीच सोपं नव्हतं परंतु काँग्रेस मद्ये जाण्याचा निर्णय मात्र चुकीचाच होता अस ही ह्या वेळी ह्या दिगग्ज नेत्यांनी बोललं आहे.
आता काँग्रेस मद्ये प्रवेश केला ही चूक होती हे राणे यांनी मान्य करावे अस म्हणत पवार यांनी राणेंना चिमटा ही काढला.
आज हा नारायण राणे जो काही आहे तो केवळ शिवसेने मुळेच असे म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्या बद्दल कृतज्ञाता व्यक्त तर केलीच परंतु राणे ह्या वेळी बाळासाहेब यांच्या आठवणीने भावुक ही झाले.
Add Comment