Maharashtra Politics

सरकारच सकारात्मक पाऊल पूरग्रस्तांनसाठी ६,००० कोटी ची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई / प्रतिनिधी : राज्यभरात पावसामुळे अतोनात नुकसान झाले असून कोल्हापूर सांगली सातारा कोकण व इतर पुराणे बाधित जिह्यात सहा हजार कोटींची मदत जाहीर केली असून यातून पीक ,नुकसान शाळा घरे रस्ते शेतकऱ्यांची जनावरे इत्यादी साठी ही भरपाई दिली जाइल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णया नंतरते पत्रकार परिषदेत बोलत होते.राज्यात २००५पेक्ष्या ही जास्त पाऊस झाला.एक ते दहा तारखे दरम्यान राज्यात अति पाऊस झाल्या मूळे नुकसान मोठं झालं आहे. या बाबत केंद्राला कल्पना दिली असून झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन केंद्रा कडे ६८००कोटी मदतीची मागणी केली आहे.यापैकी ४७००कोटी फक्त सांगली कोल्हापूर सताऱ्या साठी बाकी उरलेले २१०५कोटी कोकण नाशिक व राज्यातील इतर बाधित जिह्यासाठी दिले जातील अस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकार कडून येणारी मदत निश्चित असून त्या साठी काही अवधी लागणार असून तो पर्यंत राज्याच्या आपत्ती निवारण निधीतून भरपाई दिली जाईल नुकसान व पडझड झालेली घरे ही पूर्ण बांधून देण्यात येतील असे ही त्यांनी म्हंटल असून नक्कीच हे सकारात्मक पाऊल असून पूरग्रस्त जनतेसाठी हा निर्णय हितावह आहे.

Featured

Advertisement