गोळेगावं येथे लांडग्याच्या हल्ल्यात १४ शेळ्या मृत्यूमुखी,
घटनेत एक लाख चाळीस हजार रुपयाचे नुकसान.
छाया :जुबेर शाह
गोळेगावं बातमीदार :सिल्लोड तालुक्यातील गोळेगावं येथे गट नं २७४ मध्ये गोळेगावं येथील रहिवासी पंडित दांडगे यांच्या लहान मोठ्या १४ शेळ्यांचा लांडग्याने फडशा पडला आहे. पंडित दांडगे यांनी उन्हाळा असल्याने शेळ्या आपल्या गट नं २७४ मध्येच मोकळ्या शेतात रात्रीच्या वेळी बांधल्या होत्या. वं सकाळी ते चहा पाण्यासाठी घरी निघून आले असतांना लांडग्याने तिथे बांधून ठेवलेल्या शेळ्यांवर हल्ला केला त्यात १४ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. घटनेचा पंचनामा वनविभागाच्या श्रीमती पवार यांनी केला. सदर घटनेत जवळपास एक लाख चाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
Add Comment