सिल्लोड येथे धुलीवंदन सण उत्साहात साजरा करण्यात आला. पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे देखील दरवर्षीप्रमाणे धुलीवंदन उत्साहात पार पडले. ढोल ताशे, हलगी – सनईच्या गजरात सिल्लोड कर रंगात न्हाऊन निघाले.https://dailyzhunjaarprajatantra.com/wp-content/uploads/2024/03/IMG-20240325-WA0064.jpg
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, मुख्य रस्ता, टिळकनगर, शास्त्री कॉलनी, मेन मार्केट इत्यादी भागांत रंगपंचमीचा उत्सव पहायला मिळाला. या उत्साहात जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा गाढे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पा. तायडे, शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे, नॅशनल सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र ( बापू ) पाटील, संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, विशाल जाधव, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, रतनकुमार डोभाळ, राजू गौर, मधुकर बेंडाळे,संजय मुरकुटे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग दुधे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, युवासेनेचे अक्षय मगर, सुनील इंगळे, सागर प्रशाद, रवी गायकवाड, गौरव सहारे, प्रवीण मिरकर, मानसिंग राजपूत, भावराव दुधे, संदीप पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह सिल्लोड कारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Add Comment