सेनेचा भाजपवर जोरदार प्रहार, युती तुटण्याच्या मार्गावर ?

महाराष्ट्रात सेना भाजप युतीचं काय होणार ?
मुंबई / प्रतिनिधी : शिवसेनेने सामना मधून आज सरकारचे वाफाडे काढले असून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत नोट बंदी नंतर झालेल्या भ्रष्टाचारा मुळेच देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून याला जबाबदार भाजप ने केलेली नोट बंदीच आहे असं म्हणत सामना मधून भाजप वर वर्मी वार केला आहे. नोट बंदीच्या काळात कुणी काळ्या चे पांढरे केले. असा प्रश्न ही उपस्थित करून निर्मला सीतारामन यांची स्तुती करत त्यांनी सत्य मांडलं आहे असं ही सामना मधून मांडलं आहे. करोडो लोकांचे रोजगार घेऊन गेलेल्या नोट बंदी ने मात्र काळ्या चे पांढरे करणारांची चंगळ झाली आहे. त्यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल उपस्तीत करत. मॉर्डन इंडिया चे काय झाले असा टोला ही सेनेने लगावला असून उदयोग धंदे तर डबघाईला आले आहेच पण टपरी वाला ही मंदी च्या छायेत उभा आहे. असा घणाघात सेनेने सरकार विरोधात सामना ह्या आपल्या मुखपत्रातून केला आहे. देश्याच्या आर्थिक परिस्थिती त कमालीचा बदल झाला आहे.रोजगार जात तर आहेच पण उदयोग पती ही आत्महत्या करत आहेत असं म्हणत सेनेने सरकारच्या वर्मी लागणारी जबरदस्त टीका सामना मधून केली असून युती टिकेल की तुटेल असा प्रश्न सामान्य मात्र सामान्य जनतेला पडला आहे.

Featured

Advertisement