- साजरा केला अनोखा स्नेहमिलन !
- तब्बल २१ वर्षानंतर शिवना येथील जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांचा गेट टू गेदर
- शिवना/प्रतिनिधी
शाळा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. कारण सर्वांच्या आयुष्यात शाळा आणि शिक्षक ही खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतात. शाळा सोडल्यानंतरही हीच शाळा,शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्य आठवणीत असतात. काही जण मग स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून या आठवणी जिवंत ठेवतात. असाच एक प्रकार शिवना येथील एका शाळेत पाहायला मिळाला.
येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचं अनोखं स्नेहसंमेलन पार पडलं. 2003 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या अनोख्या स्नेहसंमेलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.आणि तब्बल 21 वर्षांनंतर पुन्हा त्याच वर्ग खोलीत शाळा भरली.विशेष म्हणजे एकुण 60 विद्यार्थीमधुन 54 विद्यार्थ्यांनी या स्नेह सम्मेलनाला हजेरी लावली.यावेळी आयोजित मेळाव्यात निवृत्त मुख्याध्यापक सरस्वती अरविंद वडगावकर संबोधित करताना म्हणाले की शाळेने आपल्याला आयुष्याची भाकरी दिली व आपण सर्वांनी मधमाशी प्रमाणे ज्ञानाचे कण वेचून जिवनात फिनिक्स पक्षी प्रमाणे उत्तुंग भरारी घेतली आहे याचे मला व सर्व शिक्षकवृंदांना अभिमान आहे.
तसेच वैभव राऊत,सपना गुप्ता आज आपण जुने क्षण आणि नाते नव्याने साजरे करण्यासाठी येथे आलों आहोत असे सांगून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील जिवनात रमुन गेले.स्नेह मेळाव्यानिमित्त व्यवसाय , कामानिमित्त दुरावलेले मित्र यानिमित्ताने एकत्र आले.यावेळी सत्कार, स्नेह भोजन, गप्पा गोष्टी कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.पुन्हा एकदा भेटण्याचे आश्वासन देऊन सर्वांनी एकमेकांना निरोप दिला. - यावेळी शिक्षिका वंदना सैतवाल , धनवई सर,गोरे सर यांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांची मने जिंकली.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुभाष काळे समाधान जाधव,पत्रकार विनोद काळे,नाना पायघोन,योगेश शिरसाट, मिनाक्षी चितळे गाडेकर,रिनाजगताप,स्वाती धनवई आदींनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन सुनील सुसर, रंगनाथ साबळे तर आभार प्रदर्शन सचिन गुप्ता यांनी केले.
Add Comment